Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे, व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याजकाने छावणीबाहेर जाऊन बरे झालेल्या कुष्ठरोग्यांस तपासून पाहावे. जर ते कुष्ठरोगी बरे झाले आहेत असे दिसून आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:3
14 Iomraidhean Croise  

मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या; तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.


ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.”


कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.


“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.


“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;


जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.


याजकाने आत जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला, तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.


रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या.


‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;


तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळात इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूरियाचा नामान मात्र शुद्ध झाला.”


मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan