Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्‍चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे, आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले एक दशांश एफा सपीठ आणि लोगभर तेल आणावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे आणण्याची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, एक दशांश एफा मैदा आणि एक लोगभर तेल आणावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जर तो गरीब असेल आणि इतके आणण्याची त्याची ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे. अन्नार्पणासाठी जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग आणावा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:21
17 Iomraidhean Croise  

जो अमिरांची भीड राखत नाही, जो श्रीमंताला गरिबांहून अधिक मानत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.) त्याला निर्दोष ठरवणे उचित होईल काय?


जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्‍याचा अवमान करतो; जो दुसर्‍याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही;


सधन व निर्धन ह्यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.


दर गोर्‍ह्यामागे एक एफा व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.


परमेश्वराप्रीत्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करायचे असल्यास होले किंवा पारव्याची पिले त्याने अर्पावीत.


तिला मेंढा अर्पण करण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावे, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल.”


आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


आणि ऐपतीप्रमाणे दोन होले अथवा पारव्याची दोन पिले त्याने आणावीत; त्यांतील एक पापबली व एक होमबली व्हावा.


पण तू ठरवलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे, आणि याजकाने नवसाच्या माणसाचे मोल ठरवावे; नवस करणार्‍याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे.


दोन होले अथवा पारव्याची दोन पिलेदेखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे; त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.


त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वराजवळ आणावीत; त्यांपैकी एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे.


तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे.


कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan