Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोगभर तेल अर्पावे आणि ते परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:12
13 Iomraidhean Croise  

तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, त्याचे चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे.


आणि हे सर्व अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेव आणि हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.


मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून ते परमेश्वरासमोर ओवाळ; तो तुझा हिस्सा आहे.


त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.


आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


आणि शुद्ध ठरवणार्‍या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे.


मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवायच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा.


“कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे; तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा; हे शेकेल पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे असावेत; हे दोषार्पण होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan