Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आठव्या दिवशी त्या मनुष्याने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा मैदा, व एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आठव्या दिवशी त्यांनी दोन निर्दोष कोकरे, एक वर्षांची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला एक एफाचा एकतृतीयांश भाग सपीठ आणि एक लोगभर तेल घेऊन यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:10
26 Iomraidhean Croise  

हातकुटीच्या पाव हिन2 तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे.


शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


आणि शुद्ध ठरवणार्‍या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे.


मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोगभर तेल अर्पावे आणि ते परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे.


याजकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;


तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्‍चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे, आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले एक दशांश एफा सपीठ आणि लोगभर तेल आणावे;


कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा.


परमेश्वराला अर्पण केलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर नसावे; कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पायचे नाहीत.


तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालायला चुकू नकोस; तुझ्या सर्व अर्पणांसह मीठसुद्धा अर्पावे.


त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपिठाचे असावे; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिन द्राक्षारस अर्पावा.


त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी.


आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले;


त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा अर्पावे;


आणि त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावे; त्याने एक वर्षाचा दोषहीन मेंढा होमबली म्हणून अर्पावा, एक वर्षाची दोषहीन मेंढी पापबली म्हणून अर्पावी आणि शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा अर्पावा;


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”


आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”


मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”


दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!


कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.”


स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”


तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan