Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला असल्यास व तो कातडीत पसरला नसल्यास याजकाने त्याला शुद्ध ठरवावे. ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुऊन शुद्ध व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 सातव्या दिवसानंतर याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर बुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; ते साधे खवंद होय; त्या मनुष्याने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 सातव्या दिवशी, याजकाने त्याची पुन्हा तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला आहे व तो त्वचेवर पसरला नसेल, तर तो शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे; कारण तो साधारण खवंद होय. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत आणि पूर्ववत शुद्ध व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:6
23 Iomraidhean Croise  

आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


तर तू स्वर्गातून त्यांची ती प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे.


स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.


“मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल?


सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.


चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील.


त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावेत.


कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;


मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे;


तरीपण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखवल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.


आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे.


जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा; पण शंकाकुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका.


तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2


ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.


म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan