Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 एखाद्या वस्त्राला, मग ते लोकरीचे असो की सणाचे असो, महारोगाचा चट्टा पडला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 “एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 एखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:47
13 Iomraidhean Croise  

त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणांसाठी सजवलीस आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हायची नाही अशी शिंदळकी त्यांवर केलीस.


जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.


अथवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चामड्याला किंवा चामड्यापासून बनवलेल्या वस्तूला पडला,


ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यांवर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला, तर ती वस्तू जाळावी; ते पसरत जाणारे कुष्ठ असल्यामुळे ती वस्तू अग्नीत जाळून टाकली पाहिजे.


लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरवण्याचा हा नियम होय.”


कपड्यावरील अथवा घराचा महारोग,


रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.


ते असे की, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे;


कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.


त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा; आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.


Lean sinn:

Sanasan


Sanasan