Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावेत; त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावेत, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि ‘अशुद्ध, अशुद्ध’ असे ओरडत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांस इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:45
24 Iomraidhean Croise  

रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.


तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.


त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे?


मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले.


म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”


कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.


पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.


निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


आपण आपल्या लज्जेत लोळू या, आमची अप्रतिष्ठा आम्हांला झाको; कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर ह्याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.”


राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली, तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत.


“दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”


उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”


मग मी केले आहे तसे तुम्ही कराल, तुम्ही ओठ झाकणार नाही व सुतकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही.


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा.


तर तो मनुष्य महारोगी असून अशुद्ध होय; याजकाने त्याला अवश्य अशुद्ध ठरवावे; त्याच्या डोक्यावर पडलेला तो महारोगाचा चट्टा होय.


आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे, ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करण्यासाठी ज्याच्यावर संस्कार झाला आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत;


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे;


आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटण्यास आले.


हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan