Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास, आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास, तो महारोगाचा चट्टा समजावा; अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा; मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याजकाने त्या व्यक्तीच्या त्वचेवरील चट्टा तपासावा आणि चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील व तो त्वचेपेक्षा खोल गेलेला असेल, तर हा कुष्ठरोग समजावा; आणि याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी केल्यावर, त्याला विधिनियमानुसार अशुद्ध म्हणून जाहीर करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:3
29 Iomraidhean Croise  

मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.


प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वच्छंदी वेश्येच्या कृतीप्रमाणे हे सर्व केलेस; तेव्हा तुझे मन किती दुर्बळ आहे!


त्यांनी माझ्या लोकांना शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, ह्यांचा भेद त्यांना त्यांनी दाखवून द्यावा.


परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही.


ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा;


याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल,


“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;


याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले, तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय.


पण त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला व त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला सात दिवस कोंडून ठेवावे;


याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.


तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट अथवा तांबूस रेषा पडल्या असल्या आणि भिंतीत त्या खोलवर गेल्या असल्या,


सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे, चाई,


सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम;


त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहोत असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा; मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “याजकांना शास्त्राचा अर्थ विचारा की,


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”


ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”


तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालनपोषण तुम्ही करावे.


तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे? कधीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. “लोभ धरू नकोस,” असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते.


त्यांच्यात हुमनाय व आलेक्सांद्र हे आहेत; त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.


आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्‍यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.


जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan