Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे; म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:23
13 Iomraidhean Croise  

यहूदाने त्या ओळखून म्हटले, “ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे; कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही.” ह्यापुढे त्याने कधी तिच्याशी शरीरसंबंध केला नाही.


दावीद नाथानाला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे,” नाथान दाविदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे; तू मरणार नाहीस.


जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.


तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो रोगाची लागण आहे.


एखाद्याच्या कातडीत जळल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल,


पण तपासाअंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्याला सात दिवस कोंडून ठेवावे;


तेव्हा “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील” असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.


म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा.


बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan