Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्यास अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र यापैकी एकाकडे आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:2
23 Iomraidhean Croise  

तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.”


अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता.


तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्यापुढून चालता झाला.


पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.


म्हणून प्रभू सीयोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठवील व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील.


परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले,


मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास, आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास, तो महारोगाचा चट्टा समजावा; अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे;


याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.


याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे, व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास


तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते.


सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम;


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली; अहरोनाने मिर्यामेकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले.


कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये.”


मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन ‘स्वतःस याजकाला दाखव’ आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”


आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”


त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.


मग त्याने त्याला निक्षून सांगितले, “कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वत:स ‘याजकाला दाखव,’ आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”


महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.


परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मूळव्याध, चाई व खरूज ह्यांची अशी पीडा लावील की, तू बरा होणार नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan