Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 11:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 11:45
22 Iomraidhean Croise  

मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत.


पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.”


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथमवत्स मला द्यावेत; सात दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे; आठव्या दिवशी तू तो मला द्यावास.


मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल.


इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.


मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्‍या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.


पशू, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्यातील


“इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.


तुमच्याजवळ खरी तागडी, खरी वजने, खरा एफा2 व खरा हिन2 असावा; ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे;


म्हणून तुम्ही आपल्याला पावन करून पवित्र व्हा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.”


मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हांला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे ह्या हेतूने मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.


मी त्यांच्याकरता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.”


तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्यात व आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र व्हावे.


कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.


यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्हांला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे; तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही.


कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”


परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही;


बेथ-शेमेशकर म्हणू लागले, “ह्या परमेश्वरासमोर, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan