Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 11:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्‍या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 11:44
34 Iomraidhean Croise  

परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे.


परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.


“इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत.


पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.”


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथमवत्स मला द्यावेत; सात दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे; आठव्या दिवशी तू तो मला द्यावास.


तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून रानात फाडून टाकलेल्या पशूचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.


तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल; मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन.


मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी समुद्र खवळवतो तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करतात; सेनाधीश परमेश्वर हे माझे नाम आहे.


ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.


तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणार्‍या प्राण्यांमुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका.


“इस्राएल लोकांना सांग की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नकोस, तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नकोस, गरीब व उपरे ह्यांच्यासाठी ती राहू द्यावीत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


“इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.


तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ पवित्र व्हावे; कारण मी परमेश्वर पवित्र आहे; तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.


म्हणून तुम्ही आपल्याला पावन करून पवित्र व्हा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तू त्याला पवित्र मानावे कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पण करतो; त्याला तू पवित्र लेखावे, कारण तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.


पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?


तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्यात व आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र व्हावे.


ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’


कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हांला निवडून घेतले आहे.


कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.


यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्हांला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे; तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”


परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही;


बेथ-शेमेशकर म्हणू लागले, “ह्या परमेश्वरासमोर, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan