Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 11:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 जमिनीवर रांगणार्‍यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 11:42
12 Iomraidhean Croise  

मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.”


तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; ते खाऊ नयेत.


तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणार्‍या प्राण्यांमुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका.


ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरांतून थरथर कापत बाहेर येतील, परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे ती भयकंपित होऊन येतील; ती तुझ्यापुढे भयभीत होतील.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.


परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांना म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले?


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan