Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “जे पक्षी तुम्ही अशुद्ध समजावेत आणि ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते अशुद्ध आहेत ते हे: गरुड, गिधाड, काळे गिधाड,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 11:13
18 Iomraidhean Croise  

ती वाट कोणा हिंस्र पक्ष्यास ठाऊक नाही; कोणा घारीचीही दृष्टी तिच्यावर गेली नाही.


कावळ्याची पिले देवाला हाका मारतात; ती अन्नान्न करीत चोहोकडे भटकतात.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”


परमेश्वर म्हणतो, “पाहा, तो गरुडासारखा उडेल व मवाबावर आपले पंख पसरील.


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.


तुम्ही त्यांना ओंगळ समजावे; त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांची शवे ओंगळ समजावीत.


जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत.


घार, निरनिराळ्या जातींचे ससाणे,


त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात.


मग मी डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, दोन स्त्रिया निघाल्या, त्यांच्या पंखांत वारा भरला होता; त्यांचे पंख करकोच्याच्या पंखांसारखे होते; त्यांनी ती एफा उचलून आकाश व पृथ्वी ह्यांच्या मधल्या मार्गाने नेली.


जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan