लेवीय 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील. Faic an caibideil |