Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:2
25 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला.


त्याने तेथे जाऊन पाहिले तेव्हा त्याचे प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्याजवळ गाढव व सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले; सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकले नव्हते.


तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले.


एलीयाने त्या पन्नासांच्या नायकाला म्हटले, “मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.


एलीया त्याला म्हणाला, “मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.


तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने आपला हात कोशाला लावला म्हणून देवाने त्याला ताडन केले व तो त्याच्यापुढे गतप्राण झाला.


पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”


नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकांचे काम करीत.


तो हे सांगत आहे इतक्यात दुसर्‍या एकाने येऊन सांगितले, “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला; त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणीबाहेर नेले.


अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.


आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.


ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले.


मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे ऐंशी लोक मेले.


नादाब व अबीहू ह्यांनी परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले.


तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्‍याजवळ पुरले.


हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले.


ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत3 त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.


बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan