Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते तुम्ही पवित्र स्थळी खावे, कारण परमेश्वराच्या हव्यांपैकी तो तुझा हक्क व तुझ्या मुलांचा हक्क आहे; मला अशीच आज्ञा झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 ते तुम्ही पवित्रस्थानी बसून खावे, कारण याहवेहला अर्पण केलेल्या यज्ञपशूचा तो भाग तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी ठरलेला वाटा आहे; कारण मला तशी आज्ञा देण्यात आली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:13
7 Iomraidhean Croise  

तो मला म्हणाला, “सोडलेल्या जागेसमोरील उत्तरेकडल्या खोल्या व दक्षिणेकडल्या खोल्या पवित्र असून त्यांत परमेश्वरासमोर जाणारे याजक ह्यांनी परमपवित्र पदार्थांचे सेवन करावे; तेथे त्यांनी अन्नबली, पापबली, दोषबली वगैरे परमपवित्र पदार्थ ठेवावेत; कारण ते स्थान पवित्र आहे.


मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीजवळ खमिरावाचून खा, कारण ते परमपवित्र आहे;


ओवाळलेला ऊर आणि समर्पित केलेली मांडी ही तुम्ही, म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहेत.


अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पायची जी हव्ये आहेत त्यांतला परमपवित्र होय.


त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमिरावाचून खावे.


त्या वस्तू एखाद्या अति पवित्र स्थळी खाव्यात; तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्यात; त्या तू पवित्र समजाव्यात.


प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू याजकाच्याच आहेत; याजकाला काही कोणी देईल ते त्याचेच होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan