Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:11
16 Iomraidhean Croise  

बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्‍या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते;


त्यांनी आपल्याबरोबर परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहूदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले; यहूदाच्या सर्व नगरांत फिरून त्यांनी लोकांना शिकवले.


जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.


तेव्हा मंडळीतील स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने नियमशास्त्राचा ग्रंथ आणला.


त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला; वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.


तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”


‘परमेश्वर कोठे आहे?’ असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणार्‍यांनी मला जाणले नाही; लोकपालही1 माझ्यापासून फितले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.


परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुला सांगितलेल्या निर्णयाप्रमाणे तू निकाल दे, आणि ते ज्या काही सूचना तुला देतील त्या काळजीपूर्वक अंमलात आण.


तुला ज्या सूचना ते देतील आणि जो निर्णय तुला सांगतील तो अंमलात आण; त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवीडावीकडे वळू नकोस.


महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.


ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील.


कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan