Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यज्ञपशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्या प्रायश्‍चित्तादाखल मान्य होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:4
44 Iomraidhean Croise  

ती अहरोनाच्या कपाळावर असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक पवित्र करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करतील, त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; ती नित्य त्याच्या कपाळावर असावी; अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील.


तो गोर्‍हा दर्शनमंडपासमोर आणावा. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.


मग एक मेंढा घ्यावा, आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत,


नंतर दुसरा मेंढा घेऊन त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात ठेवावेत.


त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यांसाठी ज्या पदार्थांनी प्रायश्‍चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावेत, पण कोणा परक्याने ते खाऊ नयेत, कारण ते पदार्थ पवित्र आहेत.


त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.


इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणांतील कळपांतून दोनशे मेंढरांमागे एक कोकरू द्यावे; लोकांप्रीत्यर्थ प्रायश्‍चित्त करावे म्हणून अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही द्यावीत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व ती त्या बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.


मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे.


आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ गुराढोरांतून किंवा शेरडामेंढरातून शांत्यर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे; त्यात काही दोष नसावा.


“वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यास योग्य ठरेल.


त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा, आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.


पापार्पणाच्या गोर्‍ह्याचे जसे करायचे तसेच ह्याचेही करावे; ह्या प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल.


त्याने त्या बकर्‍याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय.


शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा; ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा.


आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा; याजकाने त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा.


आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


तो गोर्‍हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.


आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे; त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी; आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.


याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.”


मग त्याने पापार्पणाचा गोर्‍हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर ठेवले.


मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.


मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.


मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”


मग याजकाने इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल; कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पण केला आहे.


चुकून पाप करणार्‍यांसाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याला क्षमा होईल.


त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.”


लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करत असताना इस्राएल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत;


तेव्हा लेव्यांनी आपले हात गोर्‍ह्याच्या डोक्यांवर ठेवावेत; आणि लेव्यांप्रीत्यर्थ प्रायश्‍चित्त करण्यासाठी तू एक गोर्‍हा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे;


इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो.


मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.


कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.


आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan