Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्‍हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:3
79 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला.


देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”


अब्राहाम म्हणाला, “बाळा, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल.” आणि ते दोघे बरोबर चालले.


नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले.


मंडळीतील लोकांनी यज्ञपशू आणले, त्यांची संख्या सत्तर बैल, शंभर मेंढे व दोनशे कोकरे एवढी होती; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणासाठी होती.


मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराला अर्पण करण्यास लोकांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे देता यावी म्हणून ही होमार्पणे त्यांनी निराळी ठेवली. बैलांचेही त्यांनी तसेच केले.


तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.


हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”


कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;


त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले, आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली.


त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल;


दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हांला भेटेन.


म्हणून दुसर्‍या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पण केली, शांत्यर्पणे आणली; ते खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले.


नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले.


जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंत:करणात स्फूर्ती झाली त्यांनी त्यांनी ही अर्पणे आणली.


तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ;


आणि पवित्रस्थानाच्या सेवेसाठी, म्हणजे ते बांधण्यासाठी इस्राएल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला.


त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनवली; तिची लांबी पाच हात व रुंदी पाच हात अशी ती चौरस असून तिची उंची तीन हात होती.


“परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.


तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या उंच पर्वतावर, इस्राएलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो; तेथे मी त्यांचा अंगीकार करीन; तेथे तुमच्याजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पित केलेल्या सर्व वस्तू मी मागेन.


द्वाराच्या देवडीत होमार्पण, पापार्पण व दोषार्पण ह्यांचे पशू कापण्यासाठी ह्या बाजूला दोन व त्या बाजूला दोन अशी मेजे होती.


शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.


आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत.


पण परमेश्वराच्या निवासमंडपासमोर परमेश्वराला अर्पण करायला तो दर्शनमंडपाच्या दाराशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा;


तू त्यांना सांग की, इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,


आणि तो पशू दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.


पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे.


वर्षावर्षाची सात दोषहीन कोकरे, एक गोर्‍हा आणि दोन मेंढे भाकरीबरोबर अर्पावेत; त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रीत्यर्थ त्यांचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल व तो गुराढोरांचा करायचा असेल तर यज्ञपशू नर असो किंवा मादी असो, तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा.


मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.


आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा;


म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोर्‍हा परमेश्वराला अर्पावा.


त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी.


“कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे; तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा; हे शेकेल पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे असावेत; हे दोषार्पण होय.


त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकाकडे आणावा; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा; त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


“कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजार्‍याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला,


परमेश्वर मोशेला म्हणाला,


पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पण करील त्या दिवशी ते खावे; आणि जे काही त्यातले उरेल ते दुसर्‍या दिवशीही खावे;


मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.


त्याची आतडी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


आणि त्याने अहरोनाला सांगितले, ‘पापार्पणासाठी एक दोषहीन गोर्‍हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर;


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


तू परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोर्‍हा अर्पण करशील,


“परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा : इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या;


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


मग बालाक बलामाला म्हणाला, “आता चल, मी तुला दुसर्‍या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल.”


तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “तू आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा जाऊन येतो; कदाचित परमेश्वर मला दर्शन देईल; जे काही तो मला सांगेल ते मी तुला कळवीन.” असे म्हणून तो एका उजाड टेकडीवर गेला.


बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत;


ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत.


ही दोषहीन असावीत; आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्यांखेरीज ही व ह्यांबरोबरची पेयार्पणे अर्पावीत.


परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : तेरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे; ही दोषहीन असावीत.


परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून एक गोर्‍हा, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावीत;


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!”


म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.


मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल.


कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.


प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.


कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.


आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.


आणि तेथे आपले होमबली, म्हणजे मांस व रक्त, आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर अर्पावेस. आपल्या यज्ञांचे रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर ओतावेस आणि मग त्यांचे मांस तू खावेस.


पण त्यांतील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्याच्यात दुसरे कोणतेही व्यंग असले तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नकोस.


दोष अथवा व्यंग असलेला गोर्‍हा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.


असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


Lean sinn:

Sanasan


Sanasan