Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांतला अर्पावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा तुमच्यामधील कोणी याहवेहसाठी अर्पण आणतील, तेव्हा तुमच्या गुरांमधील किंवा कळपातील प्राण्यांचे अर्पण आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:2
13 Iomraidhean Croise  

काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले.


पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले.


परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.


नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


तर त्या पुरुषाने आपल्या स्त्रीला याजकाकडे आणावे आणि तिच्यासाठी अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याने त्याच्यावर तेल घालू नये आणि धूप ठेवू नये, कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan