Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत; मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तो त्याला पंखांच्या मधोमध फाडेल, त्याचे पूर्णपणे तुकडे करणार नाही आणि नंतर याजक त्याचे वेदीवरील जळत्या लाकडांवर होमार्पण करेल. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:17
20 Iomraidhean Croise  

त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन-दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले; पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत.


परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.


कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;


त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावेत. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे; हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.


त्याने ती याजकाकडे आणावीत, मग याजकाने ह्यांतील पापार्पण पहिल्याने अर्पावे; त्याची मुंडी त्याने मुरगळून मोडावी पण ती अलग करू नये;


अन्नार्पणाचा विधी असा : अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे;


त्याची आतडी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एकेक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे; सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे.


मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला.


येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.


तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan