Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पुरेशी भाकरी मिळण्याकरिता आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:6
15 Iomraidhean Croise  

अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.


तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीला येताना त्याला आढळला; त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्याला म्हटले, “तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय?” यहोनादाब म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “असे असेल तर मला तुझा हात दे.” त्याने त्याला हात दिला आणि आपल्या रथात घेतले.


तू तेलाने माखून राजाकडे गेलीस, पुष्कळ सुगंधी द्रव्ये तू वाढवलीस, आपले जासूद दूरदूर पाठवलेस, अधोलोकापर्यंत तुझ्या नीचतेचा पल्ला गेला.


मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा, त्याने हार खाल्ली आहे; त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे : त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसे त्याला करा.


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


त्याने शपथ तुच्छ मानून करार मोडला; पाहा, त्याने हातावर हात मारला तरी त्याने हे सर्व केले; तो निभावणार नाहीच.


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan