Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:5
14 Iomraidhean Croise  

परमेश्वर मला म्हणाला, “तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.


कारण सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे; त्यांना त्याची सेवा करावी लागेल, मी त्याला वनातले पशूही दिले आहेत.”’


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.”


माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.


यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे; ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही; तिचा पाठलाग करणार्‍या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठले आहे.


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे.


मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’


असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहण्यास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?


म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan