Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:20
15 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?


मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?


“तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो.


तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस?


हे देवा, तू आम्हांला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो?


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?


तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय?


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार?


ह्यावर सीयोन म्हणाली, “परमेश्वराने माझा त्याग केला आहे; प्रभू मला विसरला आहे.”


हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;


स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा, वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास? तरी हे परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस, तुझे नाम आम्हांला दिलेले आहे; आमचा त्याग करू नकोस.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan