Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:17
17 Iomraidhean Croise  

माझे डोळे दुःखाने अंधुक झाले आहेत; माझे सर्व अवयव छायारूप झाले आहेत.


हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे; माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत.


माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.


शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे; माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत.


आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


त्यांची सर्व दुष्टता तुझ्यापुढे येवो; तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर; कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.”


माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत, माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत; माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे; कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यांत मूर्च्छित होऊन पडली आहेत.


त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.


आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील.


म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो.


त्या राष्ट्रांत तुला स्वास्थ्य मिळणार नाही, तुझ्या पायांना विसावा मिळणार नाही; तेथे तुझे हृदय थरथर कापत राहील, तुझे डोळे क्षीण होतील व तुझा जीव झुरत राहील, असे परमेश्वर करील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan