Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:1
26 Iomraidhean Croise  

त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटही पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत.”


तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर; ते हे की, ‘तुम्ही पातक केल्यास मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरीन;


हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भर्त्सना करीत आहेत ती त्यांच्या शिरी उलट आण; बंदिवासाच्या देशात त्यांची लूट होऊ दे.


तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण; तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय?


माझा प्राण केवळ वायू आहे, माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसणार नाही, हे लक्षात आणा.


माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.


हे परमेश्वरा, वैर्‍याने कशी विटंबना मांडली आहे, मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालवली आहे हे लक्षात असू दे.


हे प्रभू, आमच्या शेजार्‍यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.


आम्ही आमच्या शेजार्‍यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत.


हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;


हे परमेश्वरा, तू जाणत आहेस; माझे स्मरण करून मला भेट दे, माझ्याकरता मला छळणार्‍यांचा सूड घे! तू त्यांच्यासंबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नकोस; तुझ्यासाठी मी निंदा सहन करतो ह्याचे स्मरण कर.


‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’


तिचे सर्व लोक उसासे टाकत आहेत, अन्नान्न करीत आहेत, आपला प्राण वाचवण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदल्यात आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत. “हे परमेश्वरा, लक्ष लावून पाहा, मी कशी तुच्छ झाले आहे!”


हे परमेश्वरा, पाहा, मी किती संकटात आहे! माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे; माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पाहावे तर तलवार मला निर्वंश करते, आत पाहावे तर मृत्यू आहे.


तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”


येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर.


परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत.


हे परमेश्वरा, माझ्याविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत.


हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर, क्रोधातही दया स्मर.


मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan