Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कोल्हीदेखील आपले स्तन आपल्या पिलांना पाजते; पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कोल्ही आपल्या पिलांना स्तनांजवळ घेऊन दुध पाजतात. पण माझ्या लोकांची कन्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे निर्दयी झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कोल्हीदेखील आपल्या पिलांना स्तनपान करते, पण माझे लोक वाळवंटातील शहामृगांसारखे निर्दयी झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 4:3
14 Iomraidhean Croise  

सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले.”


रानकुत्री त्यांच्या किल्ल्यांत, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील;तिचा काळ जवळ आला आहे; तिचे आयुर्दिन वाढवले जाणार नाहीत.


त्याच्या राजवाड्यात काटेरी झुडपे उगवतील व त्याच्या किल्ल्यात खाजकुईली व काटेझाडे उगवतील; तो कोल्ह्यांचे वसतिस्थान व शहामृगांचे अंगण होईल.


“स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.


मी त्यांना त्यांच्या पुत्रांचे मांस व त्यांच्या कन्यांचे मांस खायला लावीन; त्यांचे शत्रू व त्यांचा जीव घेण्यास टपणारे त्यांना वेढा घालतील व पेचात आणतील, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या शेजार्‍याचे मांस खाईल.’


हे परमेश्वरा, पाहा, हे तू कोणाला केले ह्याचा विचार कर! स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळवलेली आपली बालके खावीत काय? याजक व संदेष्टा ह्यांना प्रभूच्या पवित्रस्थानात जिवे मारावे काय?


कोमलहृदयी स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली; ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली.


तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलांना खातील व मुले आपल्या बापांना खातील; मी तुझ्या ठायी न्यायशासन करीन व तुझे सगळे उरलेले लोक सर्व दिशांना विखरून टाकीन.


आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल.


निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan