Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हे सीयोनकन्ये, तुझ्या दुष्टाईचे शासन आटोपले आहे; तो तुला आणखी पकडून नेणार नाही; हे अदोमकन्ये, तो तुझ्या दुष्टाईचा समाचार घेईल. तो तुझी पातके उघडकीस आणील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 सियोन कन्ये, तुझी शिक्षा संपली. आता पुन्हा तुला कैद करून नेले जाणार नाही. अदोमाच्या कन्ये, तुमची पापे उघडी करून परमेश्वर तुम्हास शिक्षा करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 4:22
17 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”


यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.


आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत.


मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांना पूर्ववत स्थापीन.


त्यांनी जे दुष्कर्म करून माझ्याविरुद्ध पाप केले त्या सर्वांचे मी क्षालन करीन; त्यांनी जी दुष्कर्मे करून माझ्याविरुद्ध पाप व अपराध केला त्या सर्वांची मी क्षमा करीन.


तसे मी एसावास उघडेबोडके केले आहे, मी त्याची गुप्तस्थाने उघडी केली आहेत, त्याला लपता येत नाही; त्याचा वंश, त्याचे भाऊबंद व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत, तो गत झाला आहे.


त्या दिवसांत, त्या काळी, लोक इस्राएलाचे दुष्कर्म शोधतील, पण ते नसणार; यहूदाची पातके शोधतील पण त्यांना ती सापडायची नाहीत; कारण ज्यांना मी वाचवून ठेवीन त्यांना मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो.


ऊस देशात राहणार्‍या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे; पेला तुझ्याकडेही येईल; तू मस्त होऊन आपणास नग्न करशील.


सदोमेवर कोणी हात टाकला नसून एका क्षणात तिचा नि:पात झाला; तिच्या पापापेक्षा माझ्या लोकांच्या कन्येचे दुष्कर्म अधिक झाले आहे.


माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


जो दूर असेल तो मरीने मरेल; जो जवळ असेल तो तलवारीने पडेल; ह्यांतूनही जो निभावेल तो दुष्काळाने मरेल; अशी मी त्यांच्यावरच्या माझ्या संतापाची परिपूर्ती करीन.


तू आपला भाऊ याकोब ह्याच्यावर गहजब केलास म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील, व तुला कायमचे नष्ट करतील.


एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले.”


अदोम म्हणाला, “आमची नासधूस झाली, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू;” तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील, पण मी पाडून टाकीन; आणि लोक त्यांना दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्याच्यावर सदा रुष्ट आहे, असे राष्ट्र म्हणतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan