Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 4:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नाकपूड्यातील श्वास. त्यांच्या खाचेत पकडला गेला. ज्याच्या बद्दल आम्ही असे म्हणालो की, “आम्ही त्याच्या सावलीत राहू. तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 याहवेह द्वारा अभिषिक्त, आमच्या जीवनाचा श्वास, त्यांच्या जाळ्यात अडकला. आम्ही विचार केला होता की त्यांच्या छत्राखाली कोणत्याही परकीय राष्ट्रात आम्ही रहिवास करू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 4:20
27 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.


तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने


दावीद त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करायला हात चालवण्याची तुला भीती कशी नाही वाटली?”


गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे.


लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.”


सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?”


यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.


वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.


खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिद्कियाला गाठले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्यापुढे आणले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.


तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग केला; त्यांनी सिद्कियाला यरीहोच्या मैदानात गाठले, व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.


मग त्यांनी राजाला पकडून हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.


तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत; त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत; तिचा राजा व तिचे सरदार नियमशास्त्र नसलेल्या राष्ट्रांत आहेत; तिच्या संदेष्ट्यांनाही परमेश्वरापासून काही दृष्टान्त होत नाही.


मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.


त्याने शपथ तुच्छ मानून करार मोडला; पाहा, त्याने हातावर हात मारला तरी त्याने हे सर्व केले; तो निभावणार नाहीच.


राष्ट्रांपैकी त्याच्या छायेला बसणारे त्याचे साहाय्यकर्ते तेही त्याच्यासहित तलवारीने ठार केलेल्यांमध्ये अधोलोकी गेले.


त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशू त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे.


तुझ्या सर्व नगरांतून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत तू म्हणावेस की, “मला राजा व अधिपती असावेत,” ते कोठे गेले?


ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, ‘तुम्ही खरोखर मला अभिषेक करून तुमच्यावर राजा नेमणार असलात तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबानोनाचे गंधसरू भस्म करील.’


हा मी तुमच्यापुढे आहे, परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्याविरुद्ध काही असेल तर सांगा; मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसवले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा म्हणजे मी त्याची भरपाई करीन.”


तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हांला काही सापडले नाही ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे.” ते म्हणाले, “होय, तो साक्षी आहे.”


ते आले तेव्हा त्याने अलीयाबास न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय.”


पाहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते; आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली; मी म्हटले की मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे.


तो आपल्या लोकांना म्हणाला, “मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषिक्तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे;”


तू हे जे काम केले ते काही चांगले नव्हे; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मरणदंडास पात्र आहात, कारण प्रभू परमेश्वर ह्याचा अभिषिक्त आपला स्वामी ह्याचे रक्षण तुम्ही केले नाही. राजाचा भाला व त्याच्या उशाजवळ असलेला पाण्याचा चंबू कोठे आहे तो पाहा.”


दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan