Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 शुद्ध सुवर्णतुल्य सीयोनेचे प्रिय पुत्र मातीच्या पात्रांच्या, कुंभारांच्या हातच्या कामाच्या योग्यतेचे मानण्यात येतात!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सियोनेचे मोलवान पुत्र शुद्ध सोन्याच्या बरोबरीचे होते, पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मानलेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सुवर्णतुल्य असलेल्या, सीयोनाच्या लेकरांना, आता कुंभाराच्या हातांनी घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 4:2
12 Iomraidhean Croise  

कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.”


तिने जन्म दिलेल्या मुलांपैकी कोणी तिला मार्गदर्शक नव्हता. तिने वाढवलेल्या मुलांपैकी कोणी तिचा हात धरला नाही.


परमेश्वर म्हणाला, “जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन,


आणि त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व ह्या नगराचा भंग करीन व पुरण्यास जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील.


हा कोन्या तुच्छ, फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकून दिले आहे?


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही.


इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.


मी यहूदारूप धनुष्य वाकवून एफ्राइमरूप बाण लावला आहे; हे सीयोने, मी तुझ्या पुत्रांना चेतवीन; हे ग्रीसा,2 त्यांना तुझ्या पुत्रांविरुद्ध चेतवीन; वीराच्या खड्गाप्रमाणे तुला करीन.


ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.


मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan