Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात; ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ते आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते. कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत, कारण ती रक्ताने माखली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आता तेच लोक आंधळ्यासारखे झोकांड्या खात चालले आहेत. ते रक्ताने माखून असे भ्रष्ट झाले आहेत की त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करण्याचे कोणीही धाडस करीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 4:14
15 Iomraidhean Croise  

तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.


निर्दोष, दीन जनांच्या जिवांचे रक्त तुझ्या अंगावरील वस्त्रांत सापडले आहे; ते तुझे घर फोडताना तुझ्या हाती लागले नाहीत, तर ह्या सर्वांना तुझे वर्तन कारण झाले.


ती वचने सर्व लोकांना कळवावीत म्हणून यिर्मयाला परमेश्वराने सांगितले होते; ती सर्व त्याने बोलण्याची संपवल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयाला पकडून म्हटले, “तू मेलाच पाहिजेस.


तथापि नीतिमान लोक जारिणींचा व खुनी स्त्रियांचा न्याय करतात तसा त्यांचा करतील; कारण त्या जारिणी आहेत व त्यांच्या हातांना रक्त लागले आहे.”


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील.


खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या शवाला, मृत देहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुद्ध असावे.


ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्‍या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्‍चित्त होऊ शकत नाही.


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan