Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:66 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

66 तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील, व परमेश्वराच्या आकाशाखालून तू त्यांचा विध्वंस करशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

66 क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

66 क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:66
14 Iomraidhean Croise  

ह्या नभोमंडळाखालून इस्राएलाची नावनिशाणी मी नाहीशी करीन असे परमेश्वर म्हणाला नव्हता, म्हणून त्याने योवाशाचा पुत्र यराबाम ह्याच्या द्वारे त्यांची सोडवणूक केली.


स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.


ते वार्‍याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.


त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.


ह्याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते, तर मी तुझ्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो.


आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ―


परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”


तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”


हे परमेश्वरा, तू जाणत आहेस; माझे स्मरण करून मला भेट दे, माझ्याकरता मला छळणार्‍यांचा सूड घे! तू त्यांच्यासंबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नकोस; तुझ्यासाठी मी निंदा सहन करतो ह्याचे स्मरण कर.


तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस.


इस्राएलाने चांगल्याचा धिक्कार केला आहे; शत्रू त्याच्या पाठीस लागेल.


म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वीतलावरून बुजवून टाक; विसरू नकोस.


परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील.


तो त्यांचे राजे तुझ्या हाती देईल आणि त्यांचे नाव तू पृथ्वीवरून1 नष्ट करशील. त्यांतला कोणीही शेवटपर्यंत तुझ्याशी सामना करणार नाही, तूच त्यांचा संहार करशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan