Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले; मी म्हणालो, ‘माझा अंत होत आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, आणि मला वाटले की आता माझा नाश होणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:54
15 Iomraidhean Croise  

काळोख आणि महापूर तुला व्यापून टाकत आहेत, हे तुला दिसत नाही काय?


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले.


मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.


पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस.


तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे; तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे.


त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय?


तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्‍ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.”


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan