Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:40
22 Iomraidhean Croise  

मग राजा व त्याचे सरदार ह्यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहूदा प्रांतात फिरले; ते लोकांना सांगत गेले की, “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून वाचून तुमचे जे लोक उरले आहेत त्यांच्याकडे तो वळेल.


तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंद व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्यांच्यावर दया करतील व ती ह्या देशास परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरवणार नाही.”


आपल्या वर्तनक्रमाविषयी विचार करून मी तुझ्या निर्बंधांकडे पावले वळवली.


त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही.


“म्हणून तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय ह्यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.


आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.


तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस1 उतरलेले नाही.


तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan