Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:39
27 Iomraidhean Croise  

अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” इस्राएलाचा राजा त्याला म्हणाला, “नाही, नाही; ह्या तीन राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.”


अलीशा त्या वेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडील जन बसले होते; राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठवला; तो जाऊन पोहचण्यापूर्वी अलीशा त्या वडील जनांना म्हणाला, “पाहा, ह्या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवला आहे; तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्याला लोटून द्या; त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय?”


तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”


आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आमच्यावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून, हे देवा, तू आम्हांला कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांना वाचवून अवशेष ठेवले,


तो ज्ञानाचे रहस्य तुला निवेदन करता, आपले चातुर्य बहुगुणित आहे हे तुला तो दाखवता तर किती बरे होते! देव तुझ्या बहुत अपराधांकडे कानाडोळा करतो हे लक्षात आण.


तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस?


मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते.


मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते.


तुझे पुत्र मूर्च्छित झाले आहेत, पाशात सापडलेल्या हरिणाप्रमाणे रस्त्यांच्या नाक्यानाक्यांनी ते पडले आहेत; ते परमेश्वराच्या क्रोधाने, तुझ्या देवाच्या धमकीने ग्रासले गेले आहेत.


हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.”


तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे; तुझ्या घोर दुष्कर्मांमुळे तुझी पातके फार झाली आहेत; म्हणून मी तुला हे सर्व केले आहे.


आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.


तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील.


त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील.


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालत आहेस, ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते; असे का?


दुसर्‍या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, “तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकले आहे.”


मग इस्राएल लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरत आहोत, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहोत.


माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan