Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:37
16 Iomraidhean Croise  

राजा म्हणाला, “सरूवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचे आहे? तो शिव्याशाप देत आहे; दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करतोस असे त्याला कोण म्हणेल?”


मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा.”


तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”


तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेवलास; तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले;


तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.


तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे.


मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’


परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan