Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:36
8 Iomraidhean Croise  

तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला; पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याच्यावर इतराजी झाली.


हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात, तुझ्या वतनाला पिडतात.


“आम्हांला हे ठाऊक नव्हते” असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणार्‍याला हे कळत नाही काय? तुझा जीव राखणार्‍याला माहीत नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय?


सत्याचा अगदी अभाव झाला आहे; दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतराजी झाली.


परमेश्वर म्हणतो : तुम्ही न्यायनिवाडा करा; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडवा; परका, पोरका व विधवा ह्यांच्यावर अन्याय करू नका; त्यांना उपद्रव देऊ नका; ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका.


हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर.


तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?


लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा; निर्दोष्याला निर्दोषी ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan