Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:30
11 Iomraidhean Croise  

लोक माझ्याकडे पाहून तोंडे विचकत आहेत; माझी निर्भर्त्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारत आहेत; ते एकत्र होऊन माझ्यावर चालून आले आहेत.


ते मला अमंगळ मानतात, माझ्या वार्‍यालाही उभे राहत नाहीत, माझ्या तोंडावर थुंकायला चुकत नाहीत;


हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे.


निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.


कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्‍यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.


मी मारणार्‍यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्‍यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही.


हे लष्कराच्या स्वामिनी,1 तू आपले लष्कर आता जमा कर, त्याने आम्हांला वेढा घातला आहे; ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत.


तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले,


मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;


जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर; आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस.


कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan