Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:22
20 Iomraidhean Croise  

दावीद गादास म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; परमेश्वराच्या हाती आपण पडू या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”


तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस, त्यांचा त्याग केला नाहीस, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस.


आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.


त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली.


आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस; कारण मी संकटात आहे; माझे सत्वर ऐक;


त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय?


पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.


तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो; कारण ज्या राष्ट्रांतून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन, पण तुझा पूर्ण नाश करणार नाही; तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.


एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.


आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली


कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही; म्हणून याकोबवंशजहो, तुम्ही नष्ट झाला नाहीत.


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan