Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:17
13 Iomraidhean Croise  

आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील.


माझा प्राण केवळ वायू आहे, माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसणार नाही, हे लक्षात आणा.


तारण दुर्जनांपासून दूर आहे; कारण ते तुझ्या नियमांचा आश्रय करीत नाहीत.


पाहा, माझ्या बर्‍यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.


कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.


आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.


कारण परमेश्वर म्हणतो की : शोक करतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस; कारण ह्या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दयादेखील काढून घेतली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.


ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”


त्या दिवसांपूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशूबद्दल भाडे मिळत नसे व येणार्‍याजाणार्‍यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे; कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan