Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 3:11
20 Iomraidhean Croise  

पण त्याने1 मला व्याकूळ केले आहे; तू1 त्याने माझ्या सर्व परिवाराचा विध्वंस केला आहेस.


माझा आत्मा माझ्या ठायी व्याकूळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.


अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


“परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यावर चार गोष्टी आणीन : ठार करण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे.


मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.


ज्या ह्या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे, त्या ह्या देशात शेतांची खरेदी होऊ लागेल.


ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.


यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


टपणार्‍या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे.


त्याने सांगितले की, ‘चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल; ते इतर राज्यांहून भिन्न होईल; ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकील, तिचे तुडवून चूर्ण करील.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’


‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे, ‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’ मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी! तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’


Lean sinn:

Sanasan


Sanasan