Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याने संतप्त क्रोधाने इस्राएलाचे हरएक शृंग छेदून टाकले आहे; शत्रू समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे; सभोवतालचे सर्वकाही चाटून जाणार्‍या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्याने आपल्या संतप्त क्रोधाने इस्राएलाचे सर्व बळ नष्ट केले आहे. त्याने आपला उजवा हात शत्रूंपासून मागे घेतला आहे. सर्वत्र पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे त्याने याकोबाला जाळून टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांच्या क्रोधात त्यांनी इस्राएलचे प्रत्येक शिंग नष्ट केले आहे. शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांनी त्यांचा संरक्षण करणारा उजवा हात काढून घेतला आहे. पेटलेल्या अग्नीप्रमाणे त्यांनी याकोबाभोवती असलेले सर्वकाही भस्म करून टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:3
25 Iomraidhean Croise  

कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.


मी आपल्या त्वचेवर तरट शिवले आहे. मी आपले शृंग धुळीत लोळवले आहे.


तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल1 असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे.


तू आपला हात, म्हणजे आपला उजवा हात, का आवरून धरतोस? तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर.


दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन,1 पण नीतिमानाचा ध्वज फडकत राहील.2


तुम्ही आपले नाक वर करू नका; ताठ मानेने बोलू नका.”


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?


माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील; माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल3


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार?


बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


परमेश्वर म्हणतो, मवाबाचे शृंग मोडले आहे, त्याचा हात मोडला आहे.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझा क्रोध व माझा संताप ह्या स्थळावर, मानवांवर, पशूंवर, शेतातल्या झाडांवर व भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही.”


त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली; त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले; त्याने मला उजाड, सदा कोमेजलेली असे केले आहे.


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.


ते कर्णा वाजवतात, सर्व तयारी करतात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाहीत; कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे;


आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत जाळून टाकील.”


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan