Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळंकृत केली आहेत. त्यांच्यावर कसलीही दया केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्ये दुर्गस्थानांना खाली ढकलून; त्याने ते धुळीला मिळविले आहेत. त्याने तिचे राज्य व त्यातले सरदारास अप्रतिष्ठीत व कलंकित ठरविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रभूने कसलीच दयामाया न दाखविता याकोबाच्या सर्व आवासांना गिळंकृत केले आहे; त्यांच्या क्रोधाग्नीने यहूदाह कन्येच्या तटबंदीची प्रत्येक भिंत पाडून टाकली आहे. तिचे राज्य व तिचे अधिपती या सर्वांना अपमानित करून त्यांनी जमीनदोस्त केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:2
32 Iomraidhean Croise  

परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही; त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवलेस, तरी तो आपल्या सत्त्वाला दृढ धरून राहिला आहे.”


तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील; परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील, अग्नी त्यांचा संहार करील.


त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली आहे; तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे.


कारण दृष्टान्ताच्या खोर्‍यात हा दिवस प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने गडबडीचा, पायमल्लीचा व घाबरण्याचा असा नेमलेला आहे; ह्या दिवशी भिंती मोडतील आणि डोंगरात आरोळ्यांचा प्रतिध्वनी होईल.


सर्व डामडौलास बट्टा लागावा व जगातील सर्व महाजनांची अप्रतिष्ठा व्हावी, म्हणून हे सेनाधीश परमेश्वराने योजले आहे.


तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील.


उच्च स्थळी राहणार्‍यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


त्यांना मी एकमेकांवर आदळीन, बाप व मुले ही मी एकमेकांवर आदळीन; मी त्यांची गय करणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही, त्यांचा नाश केल्यावाचून राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.”’


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.


परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्‍यांचा उत्कर्ष केला आहे.


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


प्रभू वैर्‍यासारखा झाला आहे; त्याने इस्राएलास गिळून टाकले आहे; त्याने त्याचे सर्व महाल गिळून टाकले आहेत, त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे.


तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही, मी गय करणार नाही; तर तुझ्या करणीचे प्रतिफळ तुला देईन; तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुझ्यामध्ये दिसेल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही; मी तुझी गय करणार नाही; तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारत आहे.


ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


तुझ्यामधल्या अशेरामूर्ती मी उपटून टाकीन; मी तुझ्या शहरांचा नाश करीन.


अदोम म्हणाला, “आमची नासधूस झाली, तरी ओसाड झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू;” तर सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील, पण मी पाडून टाकीन; आणि लोक त्यांना दुष्टतेचा प्रदेश व परमेश्वर ज्याच्यावर सदा रुष्ट आहे, असे राष्ट्र म्हणतील.


मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’


कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.


तुझ्या देशातील सर्व उंच व मजबूत तट, ज्यांवर तू भिस्त ठेवशील ते पाडून टाकीपर्यंत तुला तुझ्या सर्व नगरांच्या आत ते कोंडतील, आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशातील सर्व नगरांच्या आत तुला ते वेढतील.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan