Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 परमेश्वराने योजल्याप्रमाणे केले आहे; त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे; त्याने मोडतोड केली, गय केली नाही; त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षवले आहे, त्याने तुझ्या वैर्‍यांचा उत्कर्ष केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वराने सिद्ध केल्याप्रमाणे सर्व केले आहे. त्याने फार पूर्वी जाहीर केलेले आपले अभिवचन पूर्ण केले आहे. त्याने चिरडून टाकले आणि त्यांच्यावर त्याने दया दाखविली नाही. त्याने तुझ्या शत्रूंना प्रबळ केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:17
28 Iomraidhean Croise  

जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचा उच्छेद करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाकरता पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन, तसेच इस्राएल लोक इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय होतील.


हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.


माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.


मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.”


त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहेस; तू त्याच्या सर्व वैर्‍यांना हर्षवले आहेस.


तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहेस. लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाहीस.


“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.


तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’


ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”


परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.


तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.


सीयोनकन्येचा तट नाहीसा करण्याचा परमेश्वराने संकल्प केला आहे; त्याने सूत्र ताणले आहे; तो पाडून टाकण्यापासून त्याने आपला हात माघारी घेतला नाही. त्याने कोट व नगराचा तट ह्यांना शोक करायला लावले आहे; ते दोन्ही म्लान झाले आहेत.


तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस.


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू माझे पवित्रस्थान आपल्या सर्व तिरस्करणीय वस्तूंनी व अमंगळ कर्मांनी भ्रष्ट केले, म्हणून खातरीने मी तुझ्यावरची कृपादृष्टी काढून घेईन; गय करणार नाही, दया करणार नाही.


ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.


म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे.


“मी भूपृष्ठावरून सर्वकाही निखालस नाहीसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan