Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात. ते शिळ घालून दात-ओठ खातात व म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे. खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो. आम्ही तो दिवस शोधला! आणि तो पहिला आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्याविरुद्ध त्यांचे मुख मोठे रुंद उघडले आहे; दात खाऊन रागाने फुत्कार टाकीत ते म्हणतात, “आपण अखेरीस तिला गिळंकृत केले. या दिवसाची आम्ही किती वाट पाहत होतो; ते बघण्यास आपण जिवंत आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:16
31 Iomraidhean Croise  

कारण दुष्टांनी व कपटी जनांनी माझ्यावर तोंड सोडले आहे; ते खोडसाळ जिभेने माझ्याविरुद्ध बोलले आहेत.


हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल.


तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते;


फाडून टाकणार्‍या व गर्जना करणार्‍या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत.


जेवणाला नावे ठेवणार्‍या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दांतओठ खाल्ले.


माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”


“अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत.


दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दातओठ खातो.


“त्याला असाध्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही” असे ते म्हणतात.


दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत;


तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला तारील; कारण माझा पिच्छा पुरवणारा माझा उपहास करीत आहे; (सेला) देव आपली दया व सत्य पाठवून देईल.


तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्ध्वस्त भूमी ह्यांविषयी म्हणशील तर तुझ्या ठायी वस्तीला जागा पुरणार नाही; तुला ग्रासून टाकणारे दूर गेले आहेत.


तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’


मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मला खाऊन टाकले आहे, त्याने मला दळून टाकले आहे, त्याने मला रिकामे पात्र करून ठेवले आहे, त्याने मला अजगराप्रमाणे गिळले आहे. त्याने आपले पोट माझ्या पक्‍वानांनी भरले आहे; त्याने मला बाहेर फेकून दिले आहे.


त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.


आमच्या सर्व शत्रूंनी आमच्यावर आपले तोंड वासले आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपल्या बहिणीच्या पेल्यासारखा खोल व मोठा पेला पिशील, त्याचे माप मोठे असल्यामुळे तू हास्य व थट्टा ह्यांना पात्र होशील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पलिष्ट्यांनी सूड घेण्याची कृती केली आहे, मनात आकस धरून नाश करण्याच्या बुद्धीने त्यांनी निरंतरच्या वैरभावाने सूड घेतला आहे;


अम्मोन वंशजांना म्हण, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, इस्राएल देश ओसाड करण्यात आला, यहूदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा तू ‘वाहवा’ असे म्हटलेस;


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, तू इस्राएल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थैथै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास;


म्हणून संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यांनी तुम्हांला उद्ध्वस्त केले आहे, राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर ताबा बसावा म्हणून त्यांनी तुम्हांला चोहोकडून ग्रासले आहे, आणि तुमचे नाव लोकांच्या तोंडी झाले आहे व त्यांना तुम्ही निंदेचा विषय झाला आहात.


मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे;


इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.


आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.”


त्याचे हे भाषण ऐकणार्‍यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan