Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 येणारेजाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवतात; ते यरुशलेमकन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, “जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ती हीच का नगरी?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 रस्त्याच्या बाजूने जाणारे सुध्दा तुझ्याकडे पाहून टाळ्या वाजवतात. यरूशलेमेच्या कन्येकडे पाहून ते शिळ घालतात आणि आपल्या मस्तकाने इशारा करून म्हणतात, “हिच ती नगरी आहे का जिला ‘सौंदर्यपूर्ण’ किंवा ‘आखिल पृथ्वीस आनंदमय करणारी नगरी’ असे म्हणत?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 वाटेने जाणारे सर्व वाटसरू तुझी स्थिती बघून टाळ्या वाजवित होते; यरुशलेमकन्ये. तुझा उपहास करून डोकी हालवून ते म्हणतात, “सौंदर्याची परिपूर्णता, संपूर्ण पृथ्वीचा आनंद असे संबोधली जाणारी नगरी ती हीच आहे का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:15
38 Iomraidhean Croise  

तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे : सीयोनाची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून, आपले मस्तक हालवते.


आणि हे मंदिर उच्च स्थानी राहील तरी ह्याच्याजवळून जाणारेयेणारे चकित होऊन म्हणतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे व ह्या मंदिराचे असे का केले?’


मी लोकांना निंदेचा विषय झालो आहे; मला पाहून ते माना हलवतात.


मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात;


उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे.


देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.


सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे.


त्यांचीच जीभ त्यांना प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील; त्यांना पाहणारे सर्व जण डोके हलवतील.


परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.


तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की, ‘सीयोनेची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलवते.


आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवीत, ते अग्नीचे भक्ष्य झाले आहे, आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट झाल्या आहेत.


अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.


मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.


म्हणजे यरुशलेम व यहूदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप ह्यांचे विषय व्हावेत म्हणून त्यांना तो पाजला; आज त्यांची तशी स्थिती आहे.


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’


मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.


इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.


बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.


त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.


यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.


तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


तू सोन्यारुप्याने नटलीस; तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम व जरतारी ह्यांचा होता; तुला भोजनास सपीठ, मध व तेल हे असत; तू अति सुंदर होतीस व तू राजवैभवाला पोहचली होतीस.


तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपल्या बहिणीच्या पेल्यासारखा खोल व मोठा पेला पिशील, त्याचे माप मोठे असल्यामुळे तू हास्य व थट्टा ह्यांना पात्र होशील.


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, तू इस्राएल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थैथै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास;


मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे;


हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


तुझी जखम भरत नाही; तुझा घाय असाध्य आहे; तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझ्याविषयी टाळ्या पिटतात; कारण ज्याला तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


आणि जवळून जाणारेयेणारे ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा करत होते की,


मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या,


Lean sinn:

Sanasan


Sanasan