Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यरूशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू, सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 हे यरुशलेमकन्ये, सर्व जगात असले दुःख मी तुला काय म्हणू? मी तुझी तुलना कशाशी करू? मी तुला कोणा समान लेखू? जेणेकरून मी तुझे सांत्वन करू शकेन? हे सीयोनच्या कुमारी कन्ये? तुझा घाव सागराएवढा खोल आहे. तुला कोण बरे करू शकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:13
14 Iomraidhean Croise  

मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.


तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे : सीयोनाची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून, आपले मस्तक हालवते.


तू भूमी कंपित केली आहेस, ती विदारली आहे; तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे.


तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की, ‘सीयोनेची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलवते.


तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.


तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जिवाला सीयोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हांला का मारले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तर पाहा दहशत.


गिलादात मलम नाही काय? तेथे कोणी वैद्य नाही काय? माझ्या लोकांच्या कन्येचे घाय का बरे झाले नाहीत?


त्यांनी त्वरा करून आमच्यासाठी शोकगीत म्हणावे म्हणजे आमच्या नेत्रांतून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहतील.


“येणार्‍याजाणार्‍यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.


फारो त्यांना पाहील तेव्हा तो आपल्या सर्व लोकसमूहासंबंधाने समाधान पावेल; फारो व त्याचे सर्व सैन्य ह्यांना तलवारीने वधले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan