Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 सियोनेची वडीलधारी मंडळी भूमीवर बसून निमुटपणे आक्रंदन करीत आहे. त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोणताटाचे कपडे नेसले आहेत. यरूशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 2:10
26 Iomraidhean Croise  

तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.


आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत.


आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कंबरपट्ट्यांच्या जागी दोरी, वेणीफणी केलेल्या केसांच्या जागी टक्कल, झग्याच्या जागी गोणपाटाचे वेष्टण व सौंदर्याच्या जागी वण असे होईल.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.


अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.


अगे खास्द्यांच्या कन्ये, गप्प बस, अंधारात जाऊन लप; कारण लोक ह्यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत.


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


हायहाय! लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकान्तात बसली आहे! राष्ट्रांमध्ये जी थोर तिला कसे वैधव्य आले आहे! परगण्यांमध्ये जी राणी ती कशी करभार देणारी झाली आहे!


पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.


त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे.


परमेश्वराच्या मुखाने त्यांना विखरले आहे; तो आता त्यांच्याकडे पाहत नाही; ते याजकाचा मान राखत नाहीत, वडिलांचा सन्मान करीत नाहीत.


जे पूर्वी पक्‍वान्ने खात ते रस्त्यात दुर्बल होऊन पडले आहेत; किरमिजी पोशाखात जे वाढले ते उकिरड्यांना आलिंगन देत आहेत.


त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही.


वेशीत वडील जन दिसत नाहीत, तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत.


ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दुःखाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालत आहेत आणि धुळीत लोळत आहेत.


ते तुझ्यामुळे डोकी भादरून टाकून, कंबरेस गोणपाट गुंडाळत आहेत व मनात अति खिन्न होऊन तुझ्यासाठी मोठ्याने विलाप करीत आहेत.


ते कंबरेला गोणपाट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापील; त्या सर्वांच्या मुखावर लज्जा असेल व सर्वांची डोकी भादरण्यात येतील.


तरुण स्त्री गोणपाट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते तसा शोक करा.


ह्यास्तव जो शहाणा असेल तो अशा वेळी मौन धरील; कारण दिवस वाईट आहेत.


त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्च्छित होतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी मंदिरांतील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील; सर्व ठिकाणी ती मुकाट्याने बाहेर फेकतील.


निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.


तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली.


‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे, ‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’ मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी! तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’


Lean sinn:

Sanasan


Sanasan