विलापगीत 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिचे प्रतिपक्षी तिचे मालक बनले आहेत; तिचे शत्रू सुखात आहेत. याहवेहने तिला दुःख दिले आहे, कारण तिने अनेक पापे केली आहेत. तिचे बालक बंदिवासात गेले आहेत. ते तिच्या शत्रूचे गुलाम झाले आहेत. Faic an caibideil |